प्रवाशांसाठी गुड न्यूज! भुसावळमार्गे धावणार उधना ते जयनगर विशेष एक्स्प्रेस

फेब्रुवारी 22, 2024 4:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२४ । भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने उधना ते जयनगर या मार्गावर विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी भुसावळ जंक्शनवरून जाणार असल्याने विभागातील प्रवाशांची सोय होईल.

train 1 jpg webp

प्रवाशांची गर्दी वाढल्याने प्रशासनाने उधना ते जयनगर दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. ०९०३९ उधना जयनगर साप्ताहिक गाडी २१ फेब्रुवारी ते १३ मार्च २०२४ पर्यंत दर बुधवारी उधना येथून रात्री ८.३५ वाजता सुटेल. ती तिसऱ्या दिवशी जयनगरला सकाळी ६.३० वाजता पोहोचेल. तर ०९०४० जयनगर – उधना गाडी जयनगर येथून २३ फेब्रुवारी ते १५ मार्चपर्यंत दर शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजता उधना येथे पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा
या गाडीला चलथान, नंदुरबार, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पाटणा, बरौनी, समस्तीपुर, दरभंगा, मधुबनी येथे थांबा आहे. गाडीला १० स्लीपर क्लास, ८ सामान्य द्वितीय श्रेणी आणि गार्डस् ब्रेक व्हॅन असतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now