जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २ के २४ स्पर्धेचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२४ । गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी फिनिक्स २ के २४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थीत राहणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी या उदात्त हेतूने महाविद्यालयांमध्ये फिनिक्स २ के २४ (टेक्निकल इव्हेंट) चे आयोजन दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले आहे. यात विविध प्रकारच्या इव्हेंट चा समावेश केलेला आहे. त्यात पोस्टेरॉलिक कॉम्पिटिशन, कॅड मॅडनेस, शार्क टँक, क्विझ स्टार, टेक्नोफ्रेंजी, सर्किट ब्लास्ट, एरर सॉल्विंग अशा प्रकारचे इव्हेंट्स आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील आणि जळगाव जिल्ह्याचे कलेक्टर श्री आयुष प्रसाद हे उपस्थित असणार आहे.

तसेच कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून डॉ. गोरक्ष गर्जे (डीटीई, नाशिक), डॉ. सुहास गाजरे(प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव),डॉ. उमेश सेथिया(उएज, सेंट्रॉनिक्स) उपस्थित राहणार आहे. त्याचप्रमाणे या इव्हेंट साठी डॉ.वर्षा पाटील (सचिव, गोदावरी फाउंडेशन), डॉ. केतकी पाटील (सदस्या, गोदावरी फाउंडेशन),डॉ. वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजिस्ट) यांची उपस्थिती असणार आहे.या टेक्निकल इव्हेंट मध्ये महाविद्यालयातील तसेच परिसरातील महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. महाविद्यालयामध्ये दि. २२ फेब्रुवारी रोजी इव्हेंटच्या दिवशी स्पॉट एन्ट्रीज सुद्धा स्वीकारल्या जातील. तरी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती नोंदवावी. विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयामार्फत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच तंत्रनिकेतनच्या २२ विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे पारितोषिक मिळणार असल्यामुळे तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुख व समन्वयक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार यांनी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा यासाठी आवाहन केले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळेल.फिनिक्स २घ२४ या टेक्निकल इव्हेंट चे समन्वयक प्रा. अमित म्हसकर हे आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button