Jalgaon Temperature : तापमान 36 अंशावर, पुढील चार दिवस दिलासा मिळण्याची शक्यता

फेब्रुवारी 21, 2024 12:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२४ । फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यातच तापमान वाढ होऊ लागली आहे. यामुळे उन्हाच्या झळा बसत आहे. जळगासह खान्देशात यंदा तापमान वाढीचे संकेत मिळाले असले तरी २१ ते २४ फेब्रुवारी या चार दिवसात कमाल तापमानात दोन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.

tapman jpg webp

१९ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरात ३६.२ तर भुसावळचे तापमान ३७.३ अंशावर होते. तर मंगळवारी जळगाव शहराचे तापमान ३५.५ अंशांवर होते. पुढील चार दिवस दिलासा मिळेल असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. दरम्यान, जळगावातील तापमान ३५ अंशावर गेल्याने दुपारी उन्हाच्या झळा बसत आहे. तर रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत गुलाबी, बोचरी थंडी पडत आहे. रात्री थंडी तर दिवसा कडक ऊन, असा काहीसा अनुभव नागरिकांना येत आहे.

रुमाल, टोपीची विक्री वाढली
तापमान वाढत असल्यामुळे कडक उन्हापासून बचाव करण्याकरिता पारंपरिक खादी रुमाल तसेच फॅशनेबल कॅपला मागणी वाढत असून, शहरांमध्ये रुमाल व कॅपच्या दुकानांवर मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसून येत आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now