ग्राहकांना झटका! सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदी घसरली ; तपासून घ्या नवे दर
जळगाव लाईव्ह न्यूज । 18 फेब्रुवारी 2024 । भारतीय सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरांवर संमिश्र परिणाम दिसून येत आहे. सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असतानाच चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.सोन्याचा भाव 210 रुपयांच्या वाढीसह, तर चांदीचा भाव 590 रुपयांच्या घसरणीसह ट्रेंड करत आहे. Gold Silver Rate 19 February 2024
सराफा बाजारात सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,980 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा भाव 71,820 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्याच्या शेवटी सोने आणि चांदी दरात वाढ दिसून आली.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोने 0.26 टक्क्यांनी म्हणजेच 161 रुपयांनी 62,039 रुपयांवर ट्रेंड करत आहे. तर चांदीचा भाव येथे 0.85 टक्क्यांनी घसरून 614 रुपये प्रति किलो 71,498 रुपये झाला आहे.
जळगावातील दर
दरम्यान, गेल्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी 62,900 इतका होता, तो आठवड्याच्या अखेरीस 62,400 रुपयांवर आला. म्हणजेच गेल्या आठवड्यात सोन्याचा दरात 500 रुपयापर्यंतची घसरण दिसून आली. दुसरीकडे चांदी स्थिर दिसून आली. सध्या चांदीचा दर 72000 रुपयांवर विकला जात आहे.