⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

सोन्याच्या वाढीला ब्रेक, मात्र चांदी महागली, काय आहे आजचे नवीन दर? वाचा..

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ सुरूच आहे, पण भारतीय बाजारात आज, सोमवार, 3 ऑक्टोबरला थोडीशी घसरण झाली आहे. मात्र दुसरीकडे वायदे बाजारात आज चांदीचा भावात मोठी वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याचा दर 0.13 टक्क्यांच्या घसरणीसह उघडला. तर चांदीचा दर आज 0.95 टक्क्यांनी वाढला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोने चांदीचा आजचा भाव?
आज सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सकाळी 10 वाजता 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 67 रुपयांनी घसरून 50,027 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, सुरुवातीच्या व्यवहारात चांदीचा भाव वधारताना दिसत आहे. आज चांदीचा भाव 542 रुपयांनी वाढून 57,400 रुपये प्रति किलो झाला आहे. चांदीचा व्यवहार 57,162 रुपयांपासून सुरू झाला. काही काळानंतर किंमत वाढून 57,400 रुपये झाली.

जळगाव सुवर्णनगरीतील सोने चांदी भाव?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 46,990 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 51,300 रुपये प्रति तोळा इतका आहे. तसेच चांदी 57,500 प्रति किलो इतका आहे. दरम्यान, गेल्या साप्ताहिक व्यवहारात सोने जवळपास 200 ते 300 रुपयांनी तर चांदी 1100 ते 1200 रुपायांनीं घसरलेली दिसून आली.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी कायम
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत हिरव्या रंगात सुरू आहे. आज सोन्याने 0.10 टक्क्यांनी झेप घेतली आहे. सोन्याची स्पॉट किंमत आज 1,663.78 डॉलर प्रति औंस झाली आहे. शुक्रवारी तो 0.12 टक्क्यांनी वधारला होता, तर गुरुवारी सोन्याचा भाव एक टक्क्यांहून अधिक वाढला होता. चांदीचा भावही आज ०.८८ टक्क्यांनी वाढून १९.२ डॉलर प्रति औंस झाला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ०.१६ टक्के वाढ झाली होती, त्यानंतर गुरुवारी ती २ टक्क्यांहून अधिक वाढली होती.