जळगाव जिल्हा

आता जळगावातून धावणार थेट अयोध्येला ‘लालपरी’.. असा असणार मार्ग आणि तिकीट दर?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 14 फेब्रुवारी 2024 । गेल्या महिन्यातील 22 जानेवारी रोजी अयोध्येत राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामभक्तांना प्रभू रामाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. याच दरम्यान महाराष्ट्रातील एसटी महामंडळाने पुढाकार घेत विविध बसस्थानकांवरून अयोध्येला बस सेवा सुरु केलीय. अशातच आता जळगाव एसटी ‘रामलल्ला’चे दर्शन घडविणार आहे. जळगावातून थेट अयोध्येला ‘लालपरी’ धावणार आहे.

या पाच आगारातून धावणार अयोध्येचा बस?
जळगाव एसटी विभागाने पाच बसस्थानकांवरून भाविकांना अयोध्येला जाण्यासाठी बसची सुविधा केली आहे.जळगाव, जामनेर, चाळीसगाव, चोपडा, मुक्ताईनगर या आगारातून अयोध्या, प्रयागराज, वाराणसी (काशी) येथे ४२ प्रवासी असलेली एसटी सुविधा सुरू केली आहे. यासाठी भाविकांना अॅडव्हान्स बुकिंगनुसार एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेत कोणतीही सवलत प्रवाशांना नसणार आहे. तिकीट बुकिंग तसेच अधिक माहितीसाठी आगार व्यवस्थापकांशी संपर्क करावा, असे आवाहन जळगाव एसटी विभागाकडून केले आहे.

…असा आहे मार्ग
जळगाव बसस्थानकावरून – चोपडा – इंदौर – अयोध्या वाराणसी प्रयागराज परत वरई झाशी मार्गे जळगाव बसस्थानक, जामनेर येथून मुक्त्ताईनगर, खंडवा, इंदौर, अयोध्या, वाराणसी, प्रयागराज परत वरई, झाशी, मुक्ताईनगरमार्गे जामनेर बसस्थानक.
चाळीसगाव येथून धुळे – शिरपूर – इंदौर – अयोध्या वाराणसी – प्रयागराज परत वरई झाशी – चाळीसगाव बसस्थानक, चोपडा येथून शिरपूर – इंदौर – अयोध्या – वाराणसी – प्रयागराज परत वरई झाशी चोपडा. मुक्ताईनगर येथून खंडवा – इंदौर – अयोध्या – वाराणसी – प्रयागराज परत वरई – झाशी – मुक्ताईनगर.

असे आहेत तिकीट दर (दोन्ही बाजूचे)
बसस्थानक आणि तिकीट दर (हजारात)

जळगाव- ४,७१०
जामनेर – ४,४६०
चाळीसगाव- ४,७१०
चोपडा- ४,५५०
मुक्त्ताईनगर ४.३२०

राहणे, जेवण आदी खर्च
प्रवाशांना करावा लागणार अयोध्या, प्रयागराज व वाराणसी येथे दर्शनासाठी एसटी केवळ प्रवाशांची ने-आण करणार आहे. प्रवाशांना राहणे, जेवण, नाष्टा, मंदिर पास आदी खर्च स्वतः करावा लागणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button