Bodwad | मुलीच्या लग्नाआधीच वडिलांसोबत घडलं विपरीत.. लग्नघरी शोककळा
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२४ । घरात लग्न असल्यावर म्हटलं की आनंदाचे वातावरण राहते. मात्र लग्न आठ दिवसांवर असल्याने घरात सर्व तयारी सुरु असताना वडिलांचाच मृत्यू झाल्याच्या घटनेने लग्नघरी शोककळा पसरली आहे.निमंत्रण पत्रिका वाटप करून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वार मामा आणि भाच्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.
शिवाजी राजाराम काळबैले (वय ५०) व ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील (वय ३०) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना बोदवड- भुसावळ रस्त्यावरील करंजी साळशिंगी जंगल परिसरात घडली.
शिवाजी राजाराम काळबैले व ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील हे दोघे नात्याने मामा-भाचा असून काळबैले यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटप करून घरी दुचाकीने परत येत होते. बोदवड- भुसावळ रस्त्यावर बोदवडपासून आठ किमी अंतरावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघे जागीच गतप्राण झाले. घटनेची माहिती मिळाली असता नगराध्यक्ष आनंदा पाटील, सुनील बोरसे यांनी रुग्णवाहिका घेत घटनास्थळ गाठले.
८ दिवसांवर होते मुलीचे लग्न
अपघातात मृत्यू झालेल्या शिवाजी काळबैले यांच्या मुलीचा विवाह सोहळा १७ फेब्रुवारीला नियोजित होता. लग्न आठ दिवसांवर असल्याने घरात सर्व तयारी सुरु असताना वडिलांचाच मृत्यू झाल्याच्या घटनेने लग्नघरी शोककळा पसरली आहे.