⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

भाजपनंतर आता शरद पवार गटात नाराजीनाट्य ; रावेर लोकसभेतील 220 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२४ । रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारीबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शब्द दिला होता. मतदार संघात कामाला लागण्याबाबत सूचनाही दिल्या होत्या. यानंतर मात्र अचानक उमेदवारी श्रीराम पाटील यांना देण्यात आली. याप्रकरणी माजी आमदार संतोष चौधरी यांचे भुसावळ विभागातील समर्थक संतप्त झाले आहे.

चौधरींच्या तब्बल २२० कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सादर केले आहेत. याबावतची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुर्गेश ठाकूर, युवराज पाटील, माजी गटनेता उल्हास पगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, शहराध्यक्ष दुर्गेश ठाकूर, तालुकाध्यक्ष दीपक पाटील माजी गटनेता उल्हास पगारे, युवराज पाटील आदींसह यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव आदी भागातील २२० पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पक्षातर्फे अचानक उमेदवार बदल केल्यामुळे माजी आमदार संतोष चौधरी हे १५ रोजी संपूर्ण मतदार संघातील कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहेत, या बैठकीत सर्व कार्यकत्यांसोबत चर्चा करुन लोकसभा निवडणुकीबाचत पुढील भूमिका ठरविणार आहेत

पक्षात काय सुरू आहे?, तेच कळत नाही : ठाकूर
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाण्याची भूमिका जाहीर केली आहे. मात्र, त्यांचा पक्षाने राजीनामा घेतला नाही. तर दुसरीकडे निष्ठावंत असलेल्या माजी आमदार चौधरींना उमेदवारी दिली नाही. पक्षातही नसलेल्यांना प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी दिली. यामुळे पक्षात नेमके काय सुरु आहे? हेच कळत नाही, असेही यावेळी शहराध्यक्ष दुर्गेश ठाकूर यांनी सांगितले,