⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 18, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | रावेरात शिबिरात 75 रक्तदात्यांनी केले रक्तदान

रावेरात शिबिरात 75 रक्तदात्यांनी केले रक्तदान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२१ ।  रावेर न्यायालयाचे मुख्य न्या.आर.एल.राठोड यांच्या संकल्पनेतून रावेर येथील सर्व अधिकार्‍यांची आणि वकील संघाची गेल्या आठवड्यात बैठक होऊन ठरल्याप्रमाणे 24 रोजी येथील मराठा मंगल कार्यालयात अधिकारी वर्ग आणि रावेर वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे पोलिस अधिकारी, महसूल कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी व वकिल मंडळीने रक्तदान केले.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी न्या.राठोड यांनी जनतेला प्रशासनाच्या पाठीशी व कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले आणि रावेरमध्ये ज्या प्रमाणे सर्व अधिकारी एकत्र येऊन काम करीत आहेत तसाच पॅटर्न पूर्ण राज्यात राबविण्यात यावा, असे आवाहन केले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, नगरपालिका मुख्याधिकारी रवींद्र लांडे, पोलिस उपनिरीक्षक शीतल नाईक, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.डी.महाजन, वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.जगदीश महाजन, सचिव अ‍ॅड.डी.ई.पाटील, अ‍ॅड.व्ही.पी.महाजन, अ‍ॅड.योगेश गजरे, अ‍ॅड.मधुसूदन चौधरी,  अ‍ॅड.प्रवीण पासपोहे, अ‍ॅड.विपीन गडे, अ‍ॅड.आर.बी.चौधरी, अ‍ॅड.निलेश महाजन, अ‍ॅड.प्रमोद विचवे, अ‍ॅड.जे.जी.पाटील, अ‍ॅड.प्रमोद पाटील, अ‍ॅड.मिलिंद पाटील, अ‍ॅड.किशोर पाटील, अ‍ॅड.सांगळे, डॉ.जे.जी.पंडीत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अ‍ॅड.योगेश गजरे यांनी केले.

रक्तदान संकलनासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.उमेश कोल्हे, पीआरओ निलेश पाटील व त्यांचे सहकारी हजर होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.