जळगावचे पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली ; रेड्डी नवे एसपी

जानेवारी 31, 2024 8:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२४ । राज्याच्या गृह विभागाने तब्बल ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एमसीव्ही महेश्‍वर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

M. Raj Kumar jpg webp

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर काही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात जळगावचे पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची पदोन्नतीने सोलापूर शहर पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी यांची जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली

विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यांमध्ये एम. राजकुमार यांचीबदली करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय यांच्यासह चाळीसगाव पोलीस अधिकारी रमेश चोपडे यांची बदली पुणे येथील ग्रामीण भागातील अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांच्या जागी आता मुंबई सायबर पोलीस अधीक्षका कविता नेरकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now