जळगाव लाईव्ह न्यूज : 30 जानेवारी 2024 : सध्या मनी लॉन्ड्रींग प्रकरण, आर्थिक अनियमितता यामुळे देशात विविध राजकीय नेते आणि काही उद्योगपतींची अमलबजावणी संचालनालयकडून चौकशी सुरु असून अशातच . ईडी चौकशी झारखंडमधील मुख्यमंत्र्यांपर्यंत आली आहे.
जमीन घोटाळा प्रकरणात मनी लॉन्ड्रींगमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अडकले असून ईडीकडून कारवाई होण्याच्या भीतीने सोरेन बेपत्ता झाले आहेत. ईडीने त्यांची BMW कार जप्त केली आहे. तसेच सोरेन त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी नसल्यामुळे विमानतळावर अलर्ट जारी केला आहे.
दिल्लीत ईडीची कारवाई मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर सुरु असताना झारखंडमध्ये हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार रांचीमध्ये दाखल होत आहे. काँग्रेस आमदार आणि मंत्री मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी पोहचले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्याची तयारी सुरु असल्याचा आरोप भाजप नेते आणि खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे.