⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | काँग्रेसच्या निलंबनाच्या कारवाईनंतर डॉ. उल्हास पाटीलांनी स्पष्ट केली भूमिका ; काय म्हणाले वाचा..

काँग्रेसच्या निलंबनाच्या कारवाईनंतर डॉ. उल्हास पाटीलांनी स्पष्ट केली भूमिका ; काय म्हणाले वाचा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 23 जानेवारी 2024 । काँग्रेस पक्षाने माजी खासदार डॉ. उल्हास पाटील त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील या दोघांसह काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याने जळगावच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मात्र निलंबनाच्या या कारवाईनंतर डॉ उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले डॉ पाटील?
“काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही दिसत असल्यामुळे काँग्रेस रसातळाला जात आहे”, असं उल्हास पाटील म्हणाले. कुठलीही विचारणा किंवा नोटीस न देता कारवाई केल्याबद्दल उल्हास पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. “मला दुपारी दोन वाजेच्या सुमारास निलंबित केल्याचं पत्र मिळालं. मात्र कुठलाही विचार न करता थेट कारवाई केल्यामुळे आता त्यांना विचारायचं काय?”, असा प्रश्न उल्हास पाटील यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मागील काही दिवसापासून उल्हास पाटील यांच्यासह पत्नी वर्षा पाटील आणि कन्या डॉ केतकी पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. भाजपात प्रवेश करणार का?असा प्रश्न उल्हास पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “कारवाई झाल्यामुळे आता दुसरा काहीतरी विचार करावा लागेल”, असं म्हणत पत्नी वर्षा पाटील यांनासोबत घेऊन कन्या केतकी पाटील सोबत बुधवारी मुंबईत भाजपमध्ये पक्षप्रवेशाचे संकेत दिले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.