गुन्हेजळगाव जिल्हा

भरधाव कारवरील नियंत्रण सुटले अन्.. भुसावळात भीषण अपघात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 22 जानेवारी 2024 । भुसावळमधून अपघाताची एक घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने आलेली कार भुसावळातील महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाच्या कठड्यावर धडकली. यात एकाचा मृत्यू झाल्याची झाला. राजेश सुरेश भंगाळे (वय ४२) असे अपघातात मृत झालेल्या इसमाचे नाव आहे.

याबाबत असे की, भुसावळ शहरातील महेशनगरात वास्तव्यास असलेले तथा मेडीकल व्यावसायीक राजेश सुरेश भंगाळे (वय ४२) हे जळगावकडून भुसावळकडे जात होते. यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने रेल्वे उड्डाण पूलावर त्यांची कार पुलाच्या कठड्यावर धडकली. या अपघातात राजेश भंगाळे हे गंभीर जखमी झाले. या नंतर त्यांना जवळच असलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले.

सदर अपघाताची माहिती मिळताच राजेश भंगाळे यांचे मित्र परिवार घटनास्थळी आले. भुसावळ ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शहर पोलिस ठाण्यात प्रसन्न पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली. मृत राजेश भंगाळे याच्या पश्चात आई-वडील, बहिणी असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button