⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन

यावल अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 7 जानेवारी 2024 । यावल अभयारण्य आणि प्रादेशिकच्या सीमेवर जंगलामध्ये काल ६ रोजी यावल प्रादेशिक वन विभाग यांनी लावलेल्या लावलेल्या उच्च क्षमतेच्या ट्रॅप कॅमेऱ्यात पट्टेदार वाघाची छबी कैद झाल्याची माहिती वन विभागाकडून प्राप्त झाली आहे.

१७५.५८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या यावल अभयारण्याची वन आणि वन्यजीव संपदा कधीकाळी जगभरात दखलपात्र होती.

मेळघाट ते अनेर डॅम या नैसर्गिक टायगर कॉरिडॉर असल्याने कोरोना काळातही यावल अभयारण्यामध्ये २०२१ मध्ये वाघ आढळून आला आहे. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये असलेला वाघ हा नर आहे कि मादी आणि याचे साधारण वय किती असू शकते याची माहिती लवकरच उपलब्ध होईल. अशी माहिती यावल उप वनसंरक्षक जमीर शेख यांनी दिली‌ आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.