संतापजनक ! गतीमंद चिमुकलीला दुचाकीवर बसवून शेतात नेलं अन्… संशयित नराधम पोलिसांच्या ताब्यात

जानेवारी 7, 2024 3:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । 7 जानेवारी 2024 । गतीमंद असल्याचा फायदा घेत चिमुकलीला शेतात नेवून तिच्यावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर जळगाव शहरात उघडकीस आला. दरम्यान, यातील संशयित नराधमाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजेरी करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

image 46 jpg webp

नेमका प्रकार काय?
जळगाव शहरातील सुभाष चौक परिसरात 12 वर्षाची चिमुकली ही आपल्या परिवारासह वास्तव्याला असून चिमुकली ही गतीमंद असून तिच्या आत्यासोबत भीक मागून दोघेजण आपला उदरनिर्वाह करत असतात. शुक्रवारी ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पिडीत चिमुकली ही सुभाष चौक परिसरात भिक मागत असतांना संशयित आरोपील वसीम खान कय्युब खान वय-२५ रा. पटेलवाडा, ममुराबाद, जळगाव याने पिडीत मुलीला जवळ बोलावून तिला दुचाकी (एमएच १९ ईएच ५४३१) वर बसवून जळगाव भुसावळ महामार्गावरील दुरदर्शन टॉवरजवळील एका शेतात नेवून तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतर परत दुचाकीवर बसवून तिला सुभाष चौकात सोडून दिले. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत चिमुकलीने हा प्रकार आत्या आणि नातेवाईकांना सांगितला. त्यांनी तातडीने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी ५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता संशयित आरोपी वसीम खान अय्युब खान याच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली.

त्यानुसार संशयित आरोपीला रविवारी ७ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजता त्याच्या घरातून अटक केली आहे. दुपारी १ वाजता त्याला जिल्हा न्यायालयातील न्यायमुर्ती श्री मोहीते यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now