⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | सोन्याने ओलांडला 65 हजाराचा टप्पा, चांदीही सुसाट ; आताचा प्रति 10 ग्रॅमचा भाव तपासून घ्या..

सोन्याने ओलांडला 65 हजाराचा टप्पा, चांदीही सुसाट ; आताचा प्रति 10 ग्रॅमचा भाव तपासून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२३ । कोरोना काळापासून सोन्याच्या दरात मोठी तेजी आली आहे. सोबतच चांदीने देखील मोठा डोंगर गाठला आहे. सध्या दोन्ही धातूंचे दर सर्वसामान्यांच्या आवक्या बाहेर गेले आहे. ऐन लग्नसराईत दोन्ही धातूंच्या दरात झालेल्या वाढीने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिकचा खिसा खाली करावा लागतोय. तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करायला जाणार असाल तर आजचे दर तपासून घ्या .. Gold Silver Price 26 December 2023

MCX वरील सोने चांदीचा दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज मंगळवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत सोन्याचा भाव १९६ रुपयांनी वाढला आहे. यामुळे MCX वर सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ६३,१५० रुपयांवर ट्रेंड करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर २४० रुपयांनी वाढून ७५,६२५ रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत आहे.

जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचा दर
सोन्याचे प्रती तोळ्याचे दर सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असताना प्रती तोळ्यामागे ५० रुपयांनी घसरून जीएसटीशिवाय ६५,१९९ रुपयावर आला आहे. विनाजीएसटी २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,५०० रुपयापर्यंत विकला जात आहे. दरम्यान, सोन्याच्या दरात तेजीचे वातावरण असल्याने दर जीएसटीशिवाय ६६४३५ रुपये तोळ्यापर्यंत जाण्याचा अंदाज जाणकारांना आहे. परंतु आतापर्यंत मार्केटचा ट्रेंड पाहता सोन्याच्या दराने ६६९५० चा टप्पा गाठला तर सोने दरातील तेजी आगामी काळातही कायम राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.

दरम्यान, सध्या चांदीचा एक किलोचा विनाजीएसटी ७६,२०० रुपयांवर पोहोचला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.