गुन्हेचोपडा

चोपडा तालुक्यात 32 लाखांचा 795 किलो गांजा जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२३ । चोपडा तालुक्यातील उत्तमनगर गावात तुरीचा शेतात गांजाच्या शेतीचे कारस्थान पोलिसांनी उधळून लावले आहे. पोलिसांनी येथे छापा मारत दोन ट्रॅक्टर भरून ३२ लाखांचा ७९५ किलो गांजा जप्त केला आहे. यातील मुख्य संशयित पसार झाला असून त्याच्या अल्पवयीन भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तालुक्यातील उत्तमनगर येथील रहिवासी रवी किलाऱ्या पावरा(२५) याने स्वतःच्या तुरीच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केली असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार चोपडा ग्रामीण पोलिसांनी पोलिसांनी सापळा रचत दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास शेतात छापा टाकला. यात तुरीच्या शेतामध्ये आंतरपीक असलेले ओला गांजाची झाडे कापून सुमारे ८ क्विंटल वजन असलेला ३२ लाख रुपये किंमतीचा ओला गांजा आढळून आला. पोलिसांनी कारवाई करत तो जमा केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button