जळगावचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची बदली, नखाते यांची नियुक्ती

नोव्हेंबर 21, 2023 10:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | २१ नोव्हेंबर २०२३ | जळगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नाशिक येथील अशोक नखाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गवळी यांची नाशिक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

chandrakanat gavali jpg webp

राज्य शासनाच्या गृह विभागाने काल रात्री उशीरा राज्यातील काही वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. यात जळगावचे अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचा देखील समावेश आहे. त्यांची नाशिक येथील गुप्तचर प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, त्यांच्या जागी गुप्तचर प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असणारे अशोक नखाते यांची बदली करण्यात आली आहे.

चंद्रकांत गवळी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गुन्ह्यांच्या शोधात महत्वाची भूमिका पार पाडली. उत्तम जनसंपर्क आणि सहकार्‍यांकडून चांगली कामगिरी करवून घेण्याचा लौकीक असणारे अधिकारी म्हणून ते ख्यात होते. गवळी यांनी जळगावात आजवरचा सर्वाधिक काळ सेवा बजावली असून ३ वर्ष ते जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी पदभार सांभाळत होते. त्यांची बदली झाल्याने आता श्री.नखाते हे जळगावचे अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now