जळगाव शहर

स्टुडंट्स चॅरिटी फाऊंडेशनतर्फे रिक्षा चालकांना राशन किट वाटप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२१ । स्टुडंट्स चॅरिटी फाऊंडेशनतर्फे रविवार दि 23 मे  रोजी सकाळी 10 वाजता जळगाव रेल्वे स्टेशनवरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ५० रिक्षा चालक बांधवांना राशन किट वाटप करण्यात आले.

या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, शहर पोलीस स्टेशनचे स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय वेरूळे, युवाशक्ती फाऊंडेशनचे सचिव अमित जगताप, स्टुडंट्स चॅरिटी फाऊंडेशनचे सयाजी जाधव, नेहल मोदक आदी उपस्थित होते.

युवाशक्ती फौंडेशनच्या मागील उपक्रमातून प्रेरणा घेत आय.एम.आर. महाविद्यालयाचे १५२ विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन  स्टुडंट्स चॅरिटी फाऊंडेशनची स्थापना करून सामाजिक कार्याला सुरवात केली असून लोकडाऊन काळात रिक्षा चालक बांधवांवर उपासमारीची वेळ आली असून, सदर ५० रिक्षा वाल्यांना १५ दिवस पुरेल इतके राशनचे किट देण्यात आले.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टुडंट्स चॅरिटी फाऊंडेशनचे नेहल मोदक, संस्कृती नेवे, दिव्यांशु जैन, विनिता पाटील, चाहत कटारिया, सयाजी जाधव, वेदांत दुसने, अक्षद बेंद्रे, उमेश देशमुख, सागर निकम, दिनेश पाटील, युवाशक्तीचे प्रीतम शिंदे, संकेत छाजेड, अर्जुन भारुळे, शिवम महाजन, उमाकांत जाधव, संदीप सूर्यवंशी, पियुष हसवाल, इतर उपस्थित होते.

नागरिकांनी अश्या उपक्रमातून प्रेरणा घेत गरजूंना मदत करावी असे आवाहन विराज कावडीया यांनी केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button