जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२१ । मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पुणे आणि दानापूर दरम्यान दोन पूर्णतः आरक्षित उन्हाळी विशेष ट्रेन विशेष शुल्कासह चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
01493 विशेष अतिजलद गाडी पुणे येथून 12 मे रोजी 9.30 वाजता सुटेल व दानापूर येथे तिसर्या दिवशी 4.40 वाजता पोहोचेल. 01494 विशेष गाडी दानापूर येथून 14 मे 2021 रोजी 7.00 वाजता सुटेल व पुण्याला दुसर्या दिवशी 4.20 वाजता पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्डलाईन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी जं., पं.दीनदयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.