जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२१ – जळगाव शहरातील व्यापाऱ्यांना माल घेण्याच्या बहाण्याने गंडविणाऱ्या तिघांना तालुका पोलिसांनी अटक केली होती. पथकाने तिघांकडून इंदोर येथे जाऊन ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जळगाव तालुका पो.स्टे.ला भा.द.वि.कलम ४२० फिर्यादी प्रशांत शातीलाल पटेल, वय 33 व्यवसाय व्यापार, रा.गणपती नगर जळगाव यांचेकडुन ५२२ बॉक्स टाईल्स ७ लाख ६ हजार २०० रुपयेचा माल त्याचप्रमाणे साक्षीदार जगदिश दादूमल मंधान रा.गणपती नगर जळगाव यांचेकडुन कुकर व स्टीलची कढाई १ लाख ४५ हजार रुपयांची माल त्याचप्रमाणे परेश जगदीश तलरेजा रा.सिंधी कॉलनी जळगाव यांचे ८९ हजार ६८० रुपयांचे प्लायवूड माल त्याचप्रमाणे साक्षीदार हेमल रजनिकांत मोदी रा. जळगाव यांचेकडुन १ लाख ३९ हजार रूपये कुकर असा माल घेतलेला आहे. अशाप्रकारे तालुका पोलिसांनी प्रदिप मिरचंद माखीजा रा.जळगाव, राहूल हिरालाल वाधवानी व हरीषकुमार उर्फ राहूल शोभराजमल पेशवानी दोन्ही रा. इंदोर ( मध्यप्रदेश ) अशा आरोपींनी जळगाव शहरातील व्यापाऱ्यांना चेक देवुन विश्वासात घेवुन फसवणुक करून सदरचा माल हा इंदोर येथे घेवुन गेलेले होते.
पथकाने केला मुद्देमाल
जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/ हरीलाल लक्ष्मण पाटील, पोना/ विश्वनाथ गायकवाड, पोकॉ/महेंद्र सोनवणे व पोकॉ/ अभिषेक पाटील यांचे पथक तयार करून आरोपीतांना इंदोर येथे घेवुन जावुन त्यांचेकडुन 522 बॉक्स टाईल्स, कुकर व कढई, प्लायवुड असा १० लाख ८० हजार ६० रूपयांचा माल जप्त केला आहे.
पहा प्रक्षेपण :
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/189895826330249/