जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२१ । लॉकडाऊनमुळे गोरगरिबांच्या हाताला काम नाही.त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी मे महिन्याच्या कोट्यातून मोफत धान्य देण्याची योजना शासनाने हाती घेतली आहे.
आज रोजी अंतूर्ली वि.का.सोसायटी चे धान्य दुकानात तालुका रेशनिंग कमिटी चे सदस्य अनिल वाडीले, शे.भैया, नामदेव भोई, बी.डी.बारी सर, उस्मान भाई, राजू शिरतुरे, मधुकर वानखेडे, पंकज पाटील, शे.शाकीर भाई ,सेल्समन निवृत्ती पाटील, राहुल पाटील,अकलेश कोसोदेयांनी भेट दिली. अंत्योदय योजना, आणि पि.एच.एस. योजने अंतर्गत आघाडी सरकार तर्फे मा. मुख्यमंत्री उध्दव जी ठाकरे साहेब यांनी राज्य सरकारच्या कोट्यातून मोफत धान्य वाटप योजना मार्फत अंत्योदय योजना, बी. पी. एल.योजना जाहीर केली व त्याची अमलबजाणी केली.
आघाडी सरकार चे व सन्माननीय मुख्यमंत्री उध्दव जी ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री ना.गुलाबराव जी पाटील, मुक्ताईनगर चे लोकप्रिय आ. चंद्रकांत भाऊ पाटील यांचे लाभार्थी, नागरिक यांचे वतीने तालुका रेशनिग (वितरण) कमिटीचे सदस्य अनिल वाडी ले यांनी आभार मानले.