⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | आरोग्य | संसर्गापासून सुरक्षा… डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मंथन

संसर्गापासून सुरक्षा… डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मंथन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २२ सप्टेंबर २०२३ | जागतिक रूग्ण सुरक्षा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णालयातील संसर्गावरील प्रतिबंधात्मक उपायांवर परिसंवादांतर्गत मंथन करण्यात आले. यात निवासी डॉक्टर यांनी संसर्गापासून रूग्णांची पर्यायाने रूग्णालयाची सुरक्षा या विषयावर पॉवरपॉइंट सादरीकरण केले.

जागतिक रूग्ण सुरक्षा सप्ताहानिमीत्त मेडिसीन, सर्जरी पेडियाट्रीक, मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचे उद्घाटन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, मेडीसीन विभागप्रमुख डॉ. चंद्रय्या कांते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, प्रा.डॉ. दिलीप ढेकळे, डॉ. सी.डी. सारंग, डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. कैलास वाघ, डॉ. नेहा वझे या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या सर्व मान्यवरांचे स्वागत मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रशांत गुडेट्टी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मायक्रोबॉयोलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. कैलास वाघ यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून रूग्णालयातील संसर्गावरील प्रतिबंधात्मक उपायांविषयीच्या परिसंवादाचा उद्देश विषद केला. त्यानंतर सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मैत्रेयी बिरादर यांनी प्रिव्हेन्शन ऑफ सर्जिकल साइट इन्फेक्शन, मेडीसीन विभागप्रमुख डॉ. चंद्रय्या कांते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मोहित वाघ यांनी प्रिव्हेन्शन ऑफ कॅथेटर असोसिएटेड युटीआय, पेडीयाट्रीक विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रोहीणी देशमूख यांनी प्रिव्हेन्शन ऑफ निओनेटल इन्फेक्शन इन आयसीयु अ‍ॅण्ड वॉर्ड, मेडीसीन विभागाचे डॉ. सी.डी. सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दिनेश चौधरी यांनी प्रिव्हेन्शन ऑफ सेंट्रल लाइन असोसिएटेड ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन, तर डॉ. आकाश जाधव यांनी प्रिव्हेन्शन ऑफ व्हेटीलेटर असोसिएटेड न्युमोनिया या विषयावर पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे संसर्गावरील प्रतिबंधात्मक उपायांविषयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना माहिती दिली.

या परिसंवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संसर्गापासून रूग्णांची सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी माहिती जाणून घेतली. या परिसंवादाला १५० विद्यार्थी उपस्थित होते. जागतिक रूग्ण सुरक्षा सप्ताहानिमीत्त मायक्रोबॉयोलॉजी विभागातर्फे पोस्टर स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. पोस्टर स्पर्धेच्या माध्यमातूनही रूग्ण सुरक्षेविषयीची जनजागृतीही करण्यात आली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह