⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | या शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई दिवाळीपर्यंत देणार ; कृषी मंत्री मुंडेंचे आदेश

या शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई दिवाळीपर्यंत देणार ; कृषी मंत्री मुंडेंचे आदेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२३ । खरीप हंगामाअंतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत ज्या महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला आहे. अशा जिल्ह्यातील २७ महसूल मंडळातील शेतकरी पीक विम्याच्या निकषात पात्र ठरले आहेत. त्यांना नुकसान भरपाईच्या २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई दिवाळीपर्यंत देण्याचे आदेश कृषी मंत्री धनजंय मुंडे यांनी मुबंई येथील बैठकित दिले. जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही मागणी केली होती. त्यावर कृषीमंत्र्यांनी तात्काळ आदेश काढले आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री धनजंय मुंडे यांना पत्र देवून मागणी केली होती, यात त्यांनी म्हटले होते कि, पंतप्रधान पिक विमा योजनतेर्गंत ज्या महसूल मंडळामध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला आहे, अशा सुमारे २७ महसूल मंडळातील शेतकरी पिक विमा निकषाप्रमाणे पात्र ठरले आहेत. जिल्हयातील या पात्र महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना विम्याच्या निकषाप्रमाणे २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देय असून ती क्षेत्र पडताळणी करून तात्काळ देण्याबाबत संबधितांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या या पत्रनुसार कृषी मंत्री धनजंय मुडे यांनी मुबंईत मंत्रालया बैठक आयोजित केली होती, यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पूर्नवसन मंत्री अनिल पाटील, कृषी सचिव अनुकुमार यादव, व कृषी आयुक्त सुनील चव्हाण , पाणीपुरवठा मंत्र्यांचे खाजगी सचिव अशोक पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी कृषी मंत्री धनजंय मुंडे यांनी तातडीने निर्देश दिले की, राज्य सरकारच्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेच्या माध्यमातून प्रतिकूल हवामान परिस्थितीच्या निकषांमध्ये पात्र झालेल्या २७ महसूल मंडळांतील पात्र शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई विमा निकषाप्रमाणे देय असून, पात्र महसूल मंडळांबाबत तत्काळ अधिसूचना निर्गमित करण्याबाबतच्या सूचना यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. दिवाळीपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.शेतकऱ्यांची दसरा दिवाळी शेतकरी सुखी होवो म्हणून सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यांशी प्रत्यक्ष दूरूध्वनीद्वारे आज बोलणे झाले. यापूर्वीच याबाबत जिल्ह्यातील महसूल मंडळांची अधिसूचना काढण्यात आली असून जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई देण्यासाठी कटीबध्द असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी जिल्हा पीक विमा व शेतकरी समितीचे सी.ए. हितेश आगीवाल व मोहाडी सरपंच धनंजय सोनवणे हेही उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.