⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | दहीहंडीच्या दिवशी ग्राहकांसाठी दिलासा; सोने-चांदी दरात पुन्हा घसरण..

दहीहंडीच्या दिवशी ग्राहकांसाठी दिलासा; सोने-चांदी दरात पुन्हा घसरण..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२३ । गेल्या दोन दिवसांपासून सराफ बाजारात सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) किमतीमध्ये पडझड सुरु आहे. मात्र, जागतिक बाजारात डॉलरने आगेकूच सुरु ठेवली असल्यामुळे दोन्ही धातू दबावाखाली आले आहेत. सप्टेंबर महिन्यात दोन्ही धातू यापेक्षा उंच उडी घेतील, असा काही तज्ज्ञांचा दावा होता. मात्र या आठवड्यात सोने-चांदीला मोठी झेप घेता आली नाही. Gold Silver Rate Today

आज दहीहंडीच्या दिवशी ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली असून चांदीचा भावही आणखी स्वस्त झाला आहे. अशा स्थितीत ग्राहकांनी बाहेर पडून खरेदीचा आनंद घ्यावा.

एमसीएक्सवर सोन्याचा भाव सुमारे १०० रुपयांनी घसरला आहे. अशा प्रकारे १० ग्रॅम सोन्याचा भाव ५९ हजार ०२५ रुपयांवर घसरला असून चांदीच्या वायदे दरातही १५० रुपयांची घसरण झाली आहे. एमसीएक्सवर चांदीचा दर ७२ हजार ३१४ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

जळगाव सुवर्णनगरीमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएटी ५४,७०० रुपयावर गेला आहे. तर दुसरीकडे २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ५९,७०० रुपायांवर आहे. यापूर्वी सोन्याचा दर ५९,९०० रुपयावर होता. त्यात घसरण झालेली दिसून येतेय. त्याचप्रमाणे सध्या एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी ७३००० रुपयांवर आला आहे. यापूर्वी हा दर ७४ ते ७५ हजार रुपयावर गेला होता.

दरम्यान, आषाढी एकादशीनंतर लग्नसराई बंद झाल्याने सोने, चांदीला हौसेखातर घेणाऱ्या व्यतिरिक्त मागणी नव्हती. यामुळे सोने, चांदी बाजारात शांतता होती. श्रावण महिना सुरु झाल्यानंतर सणासुदीचे दिवस येतात. रक्षाबंधनानंतरच बाजारात उठाव वाढतो. तो उठाव दिसून आला. आगामी काळात मात्र सोने-चांदी दरात चढ-उतार होऊ शकतात. पावसाने पाठ फिरवल्याने राज्यभर दुष्काळाचे सावट आहे. त्याचा परिणाम सुवर्ण बाजारावर होऊ शकतो.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.