नवोदित चित्रकार अदिती जगताप यांच्या ‘श्रावणरंग’ चित्रप्रदर्शनाचा शुभारंभ
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२३ । जळगाव येथील नवोदित चित्रकार अदिती जगताप यांनी सादर केलेल्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रकृतींचा अनोखा कलाविष्कार ‘श्रावणरंग” या शीर्षकांतर्गत जळगाव येथील पु ना गाडगीळ आर्ट गॅलरीत 3 ते 15 सप्टेंबर दरम्यान सकाळी 11 ते 8 या वेळेत पाहावयास मिळणार आहे. अदिती जगताप या चित्रकार श्री. सचिन मुसळे यांच्याकडे गेले अनेक वर्षांपासून सातत्याने चित्रकलेची साधना करत आहे.या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी 3 सप्टेंबर रोजी आय एम आर कॉलेजच्या संचालिका प्रा शिल्पा बेंडाळे मॅडम, डॉ ये.जी. भंगाळे सर, संदीप पोतदार सर, चित्रकार सचिन मुसळे, चित्रकार अनिल पाटील
यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कला क्षेत्रातील अनेक जाणकार मान्यवर मंडळी उपस्थित होती. अदितीला शुभेच्छा देतांना प्रा बेंडाळे मॅडम यांनी सांगितले की अदितीला तिची कला जोपासण्यासाठी तिच्या आई वडिलांनी जे सहकार्य केले आहे ते खूप कौतुकास्पद आहे.त्यामुळे तिचे आई वडील सुद्धा सन्मानपात्र आहेत.
या प्रदर्शनात प्रामुख्याने ऍकरॅलीक कॅनव्हास ,सॉफ्ट पेस्टल, चारकोल वापरून साकारलेल्या वास्तववादी शैलीतील विविध चित्रकृतींचा अनोखा कलाविष्कार रसिकांसाठी पाहायला ठेवला आहे.
या प्रदर्शनाचे सूत्रसंचालण विक्रम मोरे यांनी केले असून ,आभार प्रदर्शन अदिती जगताप यांनी केले. तसेच या प्रदर्शनासाठी हर्षल कदम, पूजा साळी, कल्पेश जगताप,सुभाष जगताप यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.