जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२३ । जागतिक बाजारात सोने-चांदीत (Gold Silver Price) किंचिंत उसळी पहायला मिळाली. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम दोन्ही धातूंवर दिसून आला. जुलै महिन्यात भाव वाढल्यानंतर ऑगस्टमधील दोन तीन आठवडे घसरण दिसून आली. मात्र गेल्या आठवड्यात दरवाढीने ही घसरण भरुन निघाली.तरीही उच्चांकाकडे अजूनही दोन्ही धातूंना मोठी मजल मारता आलेली नाही. अशातच आता सणासुदीत सोने-चांदीची काय चाल असेल, किती किंमती वधारतील, अशी चर्चा सुरु आहे. आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सर्कलच्या सत्राच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून आलीय.
काय आहे आजचा मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील दर
आज मंगळवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव ७९ रुपयांनी वाढून ५८,९६६ रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा एक किलोचा दर १२२ रुपयांनी वाढून ७३,७३४ रुपयावर व्यवहार करत आहे. यापूर्वी कालच्या सत्रात सोन्याचा भाव २५१ रुपयांनी वाढून ५८,८९१ रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
जुलै महिन्यात सोन्याने मोठी उसळी घेतली होती. फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने विक्रम केला होता. तितका पल्ला अजून गाठता आलेला नाही. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम दोन्ही धातूंवर दिसून आला.
जळगावमधील दर
चालू महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात चांदीचे दर हे ७०००० हजारांच्या दरम्यान होते. मात्र, त्यानंतर त्यात वाढ होण्यास सुरुवात झाली. गेल्या दहा दिवसात जळगावात चांदीचा दर विनाजीएसटी तब्बल ३५०० ते ४००० रुपयापर्यंत वधारला आहे. सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ५९,४०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ७४००० रुपयावर आहे.