⁠ 
शनिवार, मे 18, 2024

Erandol : रामेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेलेले तीन तरुणांसोबत घडलं भयंकर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२३ । श्रावण सोमवारच्या पहिल्याच दिवशी जळगाव जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडलीय. गिरणा व तापी नदीच्या संगमावर असलेल्या रामेश्वर महादेव मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त कावड घेवून दर्शनासाठी गेलेले ३ तरुण भाविकांचा गिरणा तापी नदीच्या संगमात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय.

सागर शिंपी, अक्षय शिंपी आणि पियुष शिंपी तिन्ही रा. एरंडोल अशी बुडालेल्या तीनही मुलांची नावे आहेत. हे तीनही मुलं एकाच कुटुंबातील असल्याची माहिती ही समोर येत आहे. श्रावण सोमवार असल्याने हे तिघेही तरुण महादेवाच्या जळगावातील प्रसिद्ध असलेल्या रामेश्वर या तीर्थक्षेत्रावर जात असलेल्या कावड यात्रेत सहभागी झाले होते.

या ठिकाणी ते संगमावर गेल्यानंतर नेमके कसे बुडाले या बाबतची माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व एसडीआरएफटीम घटनास्थळी दाखल झाले असून बुडालेल्या तीन तरुणांचा शोध सुरू आहे. तीनही तरुण हे एरंडोल शहरातील रहिवासी असून एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.

बुडालेल्या तीनही मुलांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफची टीम रवाना करण्यात आली असून मुलांचा शोध सुरू आहे. या पैकी २ मुलाचा शोध लागला असून त्यांच्या मृतदेह सापडले आहेत तर इतर एकाचा शोध सुरू आहे.