जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२१ ।
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेले लसीकरण उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे. बुधवारी कोविशील्डसह कोव्हॅक्सिनचे डोस जिल्ह्याला प्राप्त झाल्यामुळे गुरुवारपासून लसीकरण पुन्हा सुरळीत होणार आहे. या साठ्यातून दुसऱ्या डोस घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असून लसीचा साठा शिल्लक असला तरच पहिल्यांदा लस घेणाऱ्यांचा नंबर लागणार आहे.
बुधवारी जिल्ह्यासाठी कोविशील्डचे साडेचार हजार व कोव्हॅक्सीनचे २ हजार ३०० वर असे डोस प्राप्त झाले असून, गुरुवारपासून शहरातील केंद्रांवर लसीकरण सुरू होणार आहे.
शहरात असे होईल लसीकरण :
जळगाव शहरातील ८ केंद्रांवर गुरुवारी लसीकरण करण्यात येईल. यात शाहू महाराज रुग्णालय, शिवाजीनगरातील डी.बी. जैन, नानीबाई अग्रवाल हॉस्पिटल, मास्टर कॉलनीतील मुलतानी हॉस्पिटल, कुंभारवाड्यातील शाहीर अमर शेख व सिंधी कॉलनीतील चेतनदास हॉस्पिटल येथे कोविशील्डची लस ; ४५ वर्षांवरील नागरिकांना देण्यात येईल.
तर गणपती नगरातील स्वाध्याय भवन व कांताई नेत्रालय येथे कोव्हॅक्सीनची लस ४५ वर्षांवरील नागरिकांना देण्यात येईल.
या प्रत्येक केंद्रावर दुसऱ्या डोसला प्राधान्य तसेच लसीच्या उपलब्धतेनुसार हेल्थवर्कर, फ्रंटलाइन वर्कर यांना दुसऱ्या डोसला प्राधान्य असेल.