जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२३ । भुसावळ शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झालेली असूनही पालिका उपाययोजना करत नाही. दरम्यान, खड्ड्यांचा त्रास व वाहनाचे नुकसान झाल्याने संतप्त झालेले माजी नगरसेवक अॅड.कैलास लोखंडे यांनी रस्त्यात कार थांबवून खड्ड्यावर बसून तासभर ठिय्या मांडून अनोखे आंदोलन केलं.
आधीच शहरातील रस्त्यांची कामे रखडली आहे. त्यात पावसाने आहे त्या रस्त्यांची दुरवस्था होऊन खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून त्यांचा अंदाज येत नाही. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजता न्यायालयात येताना अॅड. कैलास लोखंडे याच्या कारचे चाक गांधी पुतळ्याजवळील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात रुतले. यामुळे अचानक दणका बसून कारचे नुकसान होऊन ती जागीच बंद पडली.
यामुळे पालिकेच्या निषेधार्थ अॅड. लोखंडे यांनी रस्त्यावरील खड्ड्याजवळ बसून तासभर ठिय्या आंदोलन केले. पालिकेच्या कामकाजाचा निषेध केला. ते मुख्याधिकाऱ्यांना भेटून शहरातील रस्त्यांच्या दुरवस्था दूर करा, यासाठी निवेदन देणार आहेत.