शेखर सोनाळकर यांचे निधन

ऑगस्ट 4, 2023 11:21 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२३ । ज्येष्ठ समाजवादी नेते, सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर यांचं निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून ढासळली होती. आज पहाटे त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. Shekhar Sonalkar Passed Away

Shekhar Sonalkar jpg webp

सत्तरच्या दशकातील लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून जडण-घडण झालेले शेखर सोनाळकर यांनी आणीबाणीत कारावास देखील भोगला. वासंती दिघे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. यानंतर गेल्या सुमारे चार दशकांपासून जास्त काळ हे दाम्पत्य राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत होते.

शेखर सोनाळकर यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून ढासळली होती. आज पहाटे त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. जळगावातील अनेक चळवळींच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य व्यक्तीच्या हिताचे काम केले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजचा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून जळगावच्या समाजजीवनातील एक तळपता तारा काळाच्या पडद्याआड गेला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now