जळगाव लाईव्ह न्यूज। २२ जुलै २०२३। संपूर्ण जिल्ह्यासह रावेर तालुक्याला सुद्धा पावसाचा जोरदार फटका बसलेला आहे. रावेर तालुक्यातील नद्यांना पूर येऊन नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशातच सुकी नदीच्या पात्रातून एक तरूण बेपत्ता झाला आहे. एसडीआरएफची टिम तरुणाचा शोध घेत असल्याचे वृत्त आहे. तहसिलदार बंडू कापसे घटनास्थळी दाखल झाले असुन बेपत्ता झालेल्या युवकाचा एसडीआरएफ मार्फत शोध सुरु आहे.
वेर तालुक्यात सकाळ पासुन संततधार पाऊस कोसळत आहे. यातच सुकी नदीत रझोदा येथील एक जण वाहून गेल्याची माहीती समोर येथे आहे. रावेर तालुक्यातील रोझोदा येथील रवींद्र दगडू चौधरी हा तरूण गारबर्डी धरण परिसरामध्ये काल सायंकाळी पोहायला गेला होता. पोहत असतांना अचानक तो नदी पात्रात बेपत्ता झाला.
घटनेची माहीती तहसिलदार बंडू कापसे यांना मिळताच एसडीआरएफच्या टीमसह घटनास्थळी पोहचले आहे. बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध सुरु आहे. सुकी नदीला दोन्ही काठ भरून पाणी वाहत असुन यात बेपत्ता युवकाचा एसडीआरएफची टीम शोध मोहीम राबवित आहेत. तर आज सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा तालुक्यात मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.