मोठी बातमी! शेतकऱ्यांना खतासंबंधी तक्रारीसाठी व्हॉट्सॲप नंबर सुरु

जुलै 19, 2023 11:42 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२३ । राज्यातील अनेक ठिकाणी बोगस बियाणे आणि रासायनिक खतांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. यातच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बोगस खत विक्री करणाऱ्याला चाप देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. खताची लिंकिंग करणाऱ्या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी तात्काळ व्हॉट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

fertilizer jpg webp

कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत मंगळवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात कृषी विभागाचा तब्बल अडीच तास आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

शेतकऱ्यांनी सदर व्हॉट्स ॲप क्रमांकावर तक्रार केल्यावर त्यांच्या नावाबाबत गोपनीयता ठेवण्यात येईल. तसेच संबंधित जिल्ह्यातील भरारी पथकांना संदेश जाऊन त्यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी तपासणी करण्याच्या सूचना मंत्री श्री. मुंडे यांनी दिल्या.

कापूस बियाण्यांच्या बाबतीत आढावा घेताना ते म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाच्या एचटीबीटी या वाणाला केंद्र सरकार तसेच राज्य शासनाने परवानगी दिली नाही. तरीही महाराष्ट्रात या बियाण्याची विक्री होत आहे. बियाणे उत्पादनाची परवानगी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन परवाना प्रणालीमध्ये  सुधारणा करण्यात यावी, तसेच बियाण्यांच्या तक्रारींबाबत ओडिशाच्या धर्तीवर सर्वसमावेशक ॲप किंवा पोर्टल तयार  करण्यात  यावे असेही मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now