नोकरी संधी

नोकरीची मोठी संधी! नाशिक येथील इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये बंपर भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिक येथील इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये (India Security Press Nashik Road) विविध पदांवर मोठी भरती निघाली असून याची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण 108 जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहे. याभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. अर्जांची नोंदणी करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. ISP Nashik Bharti 2023

या भरतीच्या नोकरीची ठिकाण हे नाशिक येथे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. जनरल/ओबीसी आणि EWS या प्रवर्गातील उमेदवारांना ₹600/- अर्ज शुल्क भरावे लागेल तर SC/ST/PWD: प्रवर्गातील उमेदवारांना ₹200/-रुपये शुल्क भरावे लागेल. ISP Nashik Recruitment 2023

या पदांसाठी होणार भरती :
1) वेलफेयर ऑफिसर 01
2) ज्युनियर टेक्निशियन (टेक्निकल) 41
3) ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल) 41
4) ज्युनियर टेक्निशियन (स्टुडिओ) 04
5) ज्युनियर टेक्निशियन (स्टोअर) 04
6) ज्युनियर टेक्निशियन (CSD) 05
7) ज्युनियर टेक्निशियन (टर्नर) 01
8) ज्युनियर टेक्निशियन (मशीनिस्ट ग्राइंडर) 01
9) ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर) 01
10) ज्युनियर टेक्निशियन (फिटर) 04
11) ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) 02
12) ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) 03

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय?
पद क्र.1: (i) महाराष्ट्र कल्याण अधिकाऱ्यांनुसार, महाराष्ट्र राज्याद्वारे मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2 & 3: NCVT/SCVT ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा
पद क्र.4 ते 12: NCVT/SCVT ITI (एंग्रावेर/प्लेटमेकर (लिथोग्राफिक)/ फिटर/ टर्नर/मशीनिस्ट ग्राइंडर/वेल्डर/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक)

वेतनश्रेणी : 18780/- ते 67390/- रुपये दरमहा पगार मिळेल

वयाची अट: 16 ऑगस्ट 2023 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

भरतीची अधिसूचना वाचण्यासाठी : PDF

Online अर्ज: Apply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button