जळगावात पावसाने बळीराजा सुखावला, असे राहणार आजपासून पुढचे चार दिवस?
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२३ । अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याकडून गुरुवारी राज्यातील जळगावसह विविध जिल्ह्यांना पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार काल दुपारी दमदार पाऊस झाला. पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीचा मार्ग मोकळा झाला असून बळीराजा सुखावला आहे.
पुढील चार दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
दरम्यान, आजपासून पुढील चार दिवस जळगाव जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज शुक्रवारी जिल्ह्यात हलका ते मध्यम तर उद्या शनिवारी, रविवारी व सोमवारी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असली तरी यामुळे मोठं नुकसान देखील झालं आहे.
दरम्यान, पावसामुळे रावेर तालुक्यात सुमारे १५० घरांची पडझड तर अनेक ठिकाणी पिकांसह शेती वाहून गेली आहे. तर शिवाय एकाच दिवसात तालुक्यातील सुकी, मंगरूळ, व अभोडा ही धरणे भरून ओव्हर फ्लो झाली.
कोणत्या तालुक्यात किती मिमी पाऊस झाला?
जळगांव जिल्हा 7/ 07/2023
अमळनेर-45
भडगाव-6
भुसावळ-30.4
जामनेर-65
चोपडा-11
चाळीसगाव-11
रावेर-15
मुक्ताईनगर-4
धरणगाव-78
यावल-32.3
एरंडोल-51
जळगांव जिल्हा 7/ 07/2023
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 7, 2023
अमळनेर-45
भडगाव-6
भुसावळ-30.4
जामनेर-65
चोपडा-11
चाळीसगाव-11
रावेर-15
मुक्ताईनगर-4
धरणगाव-78
यावल-32.3
एरंडोल-51
राज्यात पुन्हा पावसाचा इशारा
दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या २४ तासांत राज्यात पावसाचा जोर आणखीच वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. आज म्हणजेच शुक्रवारी राज्यातील ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, वर्धा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शिवाय मुंबई ठाणे, नाशिक, धुळे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.