जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२३ । गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात हलगर्जीपणा करणे दोन पोलिस कर्मचाऱ्यांना चांगलंच महागात पडलं आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या कारवाईने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
शरद पवार यांच्या दौऱ्यात जबाबदारी बंदोबस्ताची असलेले पोलिस कर्मचारी नेमणुकीच्या ठिकाणी न थांबता सर्किट चार पोलिस कर्मचारी हाऊसमध्ये पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना आढळून आले. त्यात दोन वरीष्ठ व दोन त्यांच्या हाताखालचे कर्मचारी होते. त्यातील दोन वरीष्ठांवर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
दरम्यान, त्यांनी केलेली ही शिस्तभंगाची कारवाई आहे. असे असले तरी त्यांची नावे देण्याच्या संदर्भात पोलिस अधीक्षकांनी मौन साधले.