जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२३ । मृग नक्षत्र सुरू होऊन बारा दिवस होऊनही पाउस माणसावर रुसला असल्याचे पहायला मिळत आहे.पर्यायी पाउस लेट झाला झाल्याने भाज्या ठेट कडाडल्या असल्याचे पहायला मिळत आहे. बाजारात सध्या पालेभाज्यांचे दर पन्नाशीच्यावर पोहोचले आहेत.
हिरवी मिरची ८० रुपये किलो झाली आहे. लोणच्यासाठी लागणारा लाल लसूण २०० रुपये, आले १८० रुपये किलो झाले आहे.
जेवणात वापरली जाणारी कोथंबिर १४० रुपये किलो दराने विकली जात आहे. फुलकोबी ६० ते ७० रुपये, पत्ता कोबी ३० ते ४० रुपये, भेंडी ६० ते ८० रुपये, बटाटे २० ते २५ रुपये, टमाटे ६० ते ८० रुपये, चवळीच्या शेंगा ६० ते ८० रुपये, शेवग्याच्या शेंगा ६० ते ८० रुपये, मेथीची भाजी ७० रुपये, गिलके, दोडके, वांगी, गवार ६० ते ८० रुपये या दराने विकले जात असल्याचे दिसून आले.