⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | गुन्हे | डॉक्टरने हसतखेळतं कुटुंब अवघ्या काही तासात संपविलं, बातमी वाचून तुमचेही मन हेलावून जाईल

डॉक्टरने हसतखेळतं कुटुंब अवघ्या काही तासात संपविलं, बातमी वाचून तुमचेही मन हेलावून जाईल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२३ । सर्वांचं मन हेलावणारी एक घटना पुण्यातील दौंड तालुक्यातील वरवंड गावात घडली. एका डॉक्टरने अख्खं कुटुंबच संपवलं. आधी पत्नीचा गळा आवळला नंतर दोन्ही मुलांना विहिरीत फेकले, स्वतःही जीवन संपविले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून डॉक्टर साहेब तुम्ही गेलात, पण या चिमुकल्यांची काय चूक? अशा भावना गावकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

नेमकी काय आहे घटना?
पशुवैद्यकीय डॉक्टर अतुल दिवेकर त्यांच्या पत्नी, आणि दोन मुलांसह वरवंड येथील गंगासागर पार्कमधील रुम नंबर 201मध्ये राहत होते. त्यांची पत्नी पल्लवी या शिक्षिका आहे. त्याने आधी पत्नीचा गळा दाबला. त्यानंतर दिवेकर (वय 9) आणि मुलगी वेदांती अतुल दिवेकर (वय 6) या दोन मुलांना विहिरीत टाकून त्यांची हत्या केली. नंतर अदिवत अतुल नंतर दिवेकर घरी आले आणि त्यांनी घरात आत्महत्या केली. एक हसतखेळतं कुटुंब काही तासात संपुष्टात आलं

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गेल्यावर पोलिसांना अतुल आणि पल्लवी यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांना तात्काळ मृतदेह ताब्यात घेतले. सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, घरात मुलं सापडत नसल्याने पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. मुलांचे मृतदेह विहिरीत असल्याचं कळल्यानंतर पोलिसांनी मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. पण विहिर प्रचंड खोल असल्याने मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.