⁠ 
शनिवार, मे 18, 2024

रेल्वे विजेवर चालते तरी आपल्याला शॅाक का लागत नाही ?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | 21 जून 2023 | काही वर्षांपर्यंत भारतीय रेल डिझेल वर चालत असे मात्र कालांतराने रेल्वेचे पूर्णपणे विद्युतीकरण झाले. यामुळे डिझेलची बचत झालीच पण रेल्वेपण जलद गतीने चालु लागली. आजच्या काळात काही गाड्या वगळल्यास सर्वच गाड्या विजेवर चालतात. आता य़ा रेल्वे गाड्या नक्की विजेवर चालतात तरी कश्या आणी त्यात बसुन करंट किव्वा शॅाक का बसत नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच

विजेवर चालत असूनही, तुम्हाला ट्रेनमध्ये करंट जाणवत नाही. कारण कोचचा हाय व्होल्टेज लाइनशी थेट संपर्क होत नाही. या टच हाय व्होल्टेज लाईनने ट्रेन रुळावर धावते. हाय व्होल्टेज लाइनमधून करंटचा सप्लाय ट्रेनला इंजिनच्या वर लावलेल्या पेंटोग्राफद्वारे मिळतो. ट्रेनच्या इंजिनच्या वर बसवलेला हा पँटोग्राफ नेहमी हाय व्होल्टेज लाइनला जोडलेला असतो.

मात्र करंट न लागण्याच कारण हे आहे की, इंजिनमध्ये पेंट्रोग्राफच्या खाली इनस्युलेटर लावले जातात. जेणेकरून करंट इंजिनच्या बॉडीमध्ये उतरु नये. याशिवाय, ट्रॅक्शन ट्रान्सफॉर्मर, मोटार इत्यादी इलेक्ट्रिक डिव्हायसेजमधून निघाल्यानंतर रिटर्न करंट पुन्हा चाक आणि एक्सलमधून रेल्वेमध्ये आणि अर्थ पोटेंशियल कंडक्टरमधून परत जातं.