जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२३ । महाराष्ट्र राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले राज्यातील ४४९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील तीन पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री काढण्यात आले
यात काही असे पोलीस अधिकारी आहेत, ज्यांनी बदल्यासाठी विनंती अर्ज केला होता. अनेक महिन्यांपासून हे अधिकारी बदल्यांच्या प्रतिक्षेत होते. अखेर त्यांची विनंती मान्य करत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार, मुदत पूर्ण झालेल्या ३३६ आणि विनंतीनुसार ११३ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. अशा एकूण ४४९ पोलिस निरीक्षांच्या बदल्या पोलिस विभागाने केल्या आहेत
जिल्ह्यातील तीन पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
दरम्यान, राज्यात झालेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदलामध्ये जळगाव जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात सध्या जळगावमध्ये नेमणूक असलेले अनिल कटके यांची लाचलुचपत प्रतिबंध विभागात बदली झाली. तर प्रतापराव इंगळे (सध्या नेमणूक जळगाव)यांची जालना येथे बदली झाली. अशोक उतेकर (सध्या नेमणूक जळगाव)यांची ठाणे येथे बदली झाली. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किसनराव गजन पाटील यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यात येणारे नवीन अधिकारी
महेश शर्मा – सध्या नेमणूक नांदेड, जळगाव येणार
विशाल जैस्वाल – सध्या नेमणूक गडचिरोली, जळगाव
बबन जगताप – सध्या नेमणूक लातूर , जळगाव
सुनील पवार – सध्या नेमणूक धुळे, जळगाव