जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२३ । महापालिकेच्या सभा कामकाजात सुसुत्रता आणण्याकरिता प्रारूप सभा कामकाज जादा नियम तयार करण्यात आले असून या नियमांचे अवलोकन करण्याकरीता मनपात महापौरांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ॲड. एम.ए.पठान यांनी तयार केलेल्या प्रारूप सभा कामकाज जादा नियमांची प्रत दिली असून त्यावर अवलोकन करून काही सुचना उपसमितीच्या सदस्यांनी केल्या. त्यानंतर सदर जादा नियमांना मान्यतेसाठी महासभेपुढे ठेवले जाणार आहे.
महापालिकेच्या कामाकाजात सुसुत्रता यावी, सभेत होणारा गोंधळ टाळण्यासाठी उपविधी म्हणजेच ज्यादा नियम तयार करण्यात येत आहे. त्यासाठी महासभेत ठराव करून उपविधी तयार करण्यासाठी सेवानिवृत्त नगरसचिव ॲड. एम.ए. पठान यांना देण्यात आले होते. पठान यांनी १०२ नियमांची नियमावली बनवून त्यांची प्रारूप नियमावली महापालिकेला सादर केली असून या प्रारूप नियमावलीचे अवलोकन करण्यासाठी मंगळवारी महापौर दालनात उप समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत नियमावलीचे अवलोकर करण्यात येवून काही सुचना उप समितीच्या सदस्यांनी केल्या. त्यानंतर आता या प्रारूप नियमावलीला येणाऱ्या महासभेत मंजुरी घेतली जाणार आहे. या उप समितीत महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, नितीन लढ्ढा, सुनील महाजन, ललित कोल्हे, राजेंद्र घुगे पाटील, विशाल त्रिपाठी, ॲड. शुचिता हाडा, दिलीप पोकळे, रियाज बागवान, विधी विभागाचे मुख्य सल्लागार आनंद मुजूमदार आदींचा सामावेश आहे.