⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | निरपराध नागरिकांना अटक करू नका : संचारबंदी उद्यापासून हटवा – आ.अनिल पाटील

निरपराध नागरिकांना अटक करू नका : संचारबंदी उद्यापासून हटवा – आ.अनिल पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२३ ।  अमळनेर शहरात घडलेली दंगल हि किरकोळ कारणावरून घडली आहे. यामुळे दोशींवर कठोर कारवाई करा परंतु निरपराध नागरिकांना अटक करू नका आणि लागू करण्यात आलेली संचारबंदी उद्यापासून हटवावी अशी सुचना आमदार अनिल पाटील यांनी केली आहे.

अमळनेर शहरात किरकोळ कारणावरून दंगल झाली यातील दोषींना शिक्षा झालीच पाहिजे मात्र निरपराध व्यक्तींना वेठीस धरू नका उगीच दंगलीचा बाऊ करून जनतेत भीती निर्माण केली जात आहे. शहरात संचारबंदी लावून दुकाने व्यवसाय बंद झाल्याने नागरिकांचे नुकसान होत आहे.

एकीकडे मतदानासाठी सवलत दिली जाते आणि दुसरीकडे सामान्य जनतेला बंदी घातली जाते. सध्या पेरणी चा हंगाम असल्याने बियाणे, खते, शेती साहित्य खरेदी, दुरुस्ती आदी कामे करणे गरजेचे आहे.मात्र सध्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होत असून गणवेश, दप्तर, वह्या, पुस्तके, बूट चप्पल खरेदी करावी लागते. संचारबंदीमुळे विदयार्थी पालक व शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रशासनने संचारबंदी हटवून बाजारपेठ खुली करावी आणि जनतेने देखील शांतता ठेवावी अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह