जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२३ । जळगाव शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२५ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह जळगाव शहरात वास्तव्यास आहे. सध्या ती शिक्षण घेत आहे. दरम्यान डिसेंबर २०२२ ते अद्यापपर्यंत एजाज इंद्रिस खाटीक याने तरुणीला घरात एकटी असताना लग्नाचे आमिष दाखवत तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर जबरी अत्याचार केला.

सुरुवातील पीडित तरुणीने हि घटना घरच्यांना सांगितली नाही. परंतु अखेर मन घट्ट करत तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर शुक्रवार २ जून रोजी रात्री १० वाजता पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी एजाज इंद्रिस खाटीक याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







