⁠ 
रविवार, मे 19, 2024

मनपात स्विकारल्या जात आहेत दोन हजारांच्या नोटा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२३ । देशात दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय रिझर्व बँकेने घेतला असून दि.३० सप्टेंबर पर्यंत नोटा बदली करता येणार आहेत. परंतु काही सहकारी बँकांसह खासगी संस्थांनी दोन हजारांच्या नोटा स्विकारण्यास नकार दिल्यामुळे नागरिक बुचकड्यात पडले होते. मात्र, जळगाव महापालिकेकडून कर भरणापोटी दोन हजार रुपयांच्या नोटा स्विकारल्या जात असल्यामुळे अनेक जणांचा मालमत्ताकर भरण्याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव महापालिकेकडून मालमत्ता कर व पाणी पट्टीचा भरणा करतांना दोन हजारांच्या नोटा स्विकारल्या जात असल्यामुळे नागरिकांकडून मनपाचा कर भरणा केला जात आहे. गेल्या दोन दिवसात महानगरपालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयात तब्बल ६०० नोटा दोन हजारांच्या जमा झालेल्या आहेत. तसेच यापुढे देखील कर भरणाऱ्या नागरिकांकडून दोन हजारांच्या नोटा स्विकारल्या जाणार आहेत. रिझर्व बँकेने दि.३० सप्टेंबरपर्यंत नोटा स्विकारण्याची मुदत दिली असल्यामुळे रिझर्व बँकेचा पुढील निर्णय येईपर्यंत मनपाकडून दोन हजारांच्या नोटा घेतल्या जाणार आहेत.

चालू आर्थिक वर्षांची घरपट्टी व पाणी पट्टी दि.३१ मे २०२३ पर्यंत भरल्यास संबधित मालमत्ताधारकांना १० टक्के सूट (सवलत) देण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी मालमत्ता व पाणी पट्टीचा कर भरून या सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतिने करण्यात आले आहे.

चालू आर्थिक वर्षांची घरपट्टी व पाणी पट्टी दि.३१ मे २०२३ पर्यंत भरल्यास संबधित मालमत्ताधारकांना १० टक्के सूट (सवलत) देण्यात येत असते तसेच मालमत्ता महिलेच्या नावावर असेल तर, त्या महिलांना आणखी ५ टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे महिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तेच्या करात १५ टक्के सवलत दिली जात आहे.