शिंदे आणि भाजपमध्ये होणार तू-तू मैं-मैं ? शिंदे गटाच्या या मागणीने वाढवली भाजपची डोकेदुखी
जलगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२३ । भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी आता शिंदे गटाने वाढवली आहे. कारण त्यांनी केलेल्या मागणीमुळे भारतीय जनता पक्षामध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना महाराष्ट्रात लोकसभेच्या 22 जागा लढवेल अशी मागणी त्यांच्या खासदाराने केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.
शिवसेनेत झालेल्या अद्भुतपूर्व बंडानंतर महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार आले. या शिंदे सरकारला शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रातील 18 पैकी 13 खासदारांनी आपले समर्थन दर्शवले. तर पाच हे ठाकरेंसोबत कायम राहिले. एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाची युती असल्यामुळे दोघांमध्ये आत्ता तरी वातावरण फार चांगले आहे. असेच दिसून येत आहे. मात्र शिवसेनेने केलेल्या 22 जागांच्या मागणीमुळे भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झाल्याचा पाहिला मिळत आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी मध्ये आम्ही १८ जागा लढण्यार अशी घोषणा केल्या नंतर महाविकास आघाडीमध्ये देखील तू तू मै मै पाहायला मिळाली होती. यातच आता एकनाथ शिंदे गट २२ जागा लढवणार असे म्हटल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेमध्ये देखील असेच काही मिळते का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.