⁠ 
रविवार, मे 19, 2024

दोन वर्षांची चिमुकली पडली पाण्याच्या टाकीत ; कुटुंबीयांचा आक्रोश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२३ । घरासमोरील पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली आहे. (ता. २०) सायंकाळी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मांढळ येथे हि घटना घडली. त्रिषा अरविंद मिसार असे तिचे नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की, अरविंद मिसार मांढळ येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. परिसरात नळाचे पाणी व्यवस्थित पोहचत नाही. त्यामुळे नागरिकांनी निदान पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी घरासमोरील अंगणात सिमेंटचा खोल खड्डा तयार केला आहे. मिसार यांच्या घराच्या अंगणात देखील पाण्याची टाकी आहे.

पाण्याच्या टाकीत उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बालिका त्रिशा घरासमोरील अंगणात खेळत होती. खेळता खेळता ती जवळपास ३ फूट पाणी असलेल्या पाण्याच्या टाकीत पडली. घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तत्काळ त्रिशाला पाण्याबाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.