दहशत निर्माण करण्याऱ्या दोन जणांना केली एमआयडीसी पोलीसांनी अटक !

जळगाव लाईव्ह न्यूज : १९ मे २०२३ : शहरात हातात तलवार घेवून दहशत निर्माण करण्याऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी शनिवारी २० मे रोजी रात्री अटक केली. सिंधी कॉलनी परिसरातील कंवर नगर पोलीस चौक परिसरातुन त्यांना अटक करण्यात आली. यातील एक संशयित आरोपी हा एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार आहे.

police atak jpg webp

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंवर नगर पोलीस चौक परिसरात हद्दपार असलेल्या आरोपीसह एकजण हे दोनजण दुचाकीवर बसून हातात तलवार घेवून दहशत निर्माण करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली.

त्यानुसार पोलीस पथकाने संशयित आरोपी जुनेद शेख उर्फ बवाली युनूस शेख (वय २६,रा. बिलाल चौक, तांबापुरा) , रहीम शेख सलीम (वय २८, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) या दोघांना ताब्यात घेतले. यातील जुनेद शेख हा जळगाव जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार आहे.

तो सिंधी कॉलनी रस्त्यावरील कंवरनगर पोलीस चौकी परिसरात २० मे रोजी मिळून आला. त्याच्याकडून लोखंडी लहान तलवार हस्तगत केली आहे. रहीम शेख यांचेकडे कमरेला लोखंडी लहान तलवार मिळून आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर भालेराव यांचे फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना सचिन मुंढे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now