जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२३ । सोने आणि चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे सोन्याच्या किमतीत पुन्हा घसरण झाली आहे. उच्चांक पातळीपासून सोने आता जवळपास 1000 ते 1100 रुपयांनी घसरले आहे.
यापूर्वी, 4 मे 2023 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 61700 रुपये (विनाजीएसटी) प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. तो सध्या आता 60,000 रुपयांच्या जवळ आला आहे.
सोन्याचा भाव 150 रुपयांनी घसरून 60650 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला. त्याच वेळी, गेल्या व्यापार सत्रात सोन्याचा भाव 60,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. मात्र, दुसरीकडे चांदीच्या किमतीत किंचित 100 रुपयाची वाढ झालेली दिसून येत आहे. चांदीचा दर 72,600 रुपये (विनाजीएसटी) किलो झाला आहे.
ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता