जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२३ । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप शिंदे फडणवीस सरकारने मागे घेतले आहेत.याचबरोबर डिसेंबर 2021 मध्ये केलेलं निलंबन आदेशही मागे घेतले आहेत.
यावेळी निलंबनाचा कालावधी ऑन ड्युटी असल्याचं मानलं जावं, असं आदेशात म्हटलं आहे. “ऑल इंडिया सर्व्हिसेस (शिस्त आणि अपील) नियम, 1969 च्या नियम 8 अंतर्गत परम बीर सिंह, IPS (निवृत्त) यांच्या विरुद्ध 02/12/2021 रोजी जारी केलेले आरोपपत्र मागे घेण्यात आले आहे आणि हे प्रकरण बंद करण्यात येत आहे, सरकारचे संयुक्त सचिव वेंकटेश भट यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.
त्यांच्या निलंबनाशी संबंधित अन्य आदेशात म्हटले आहे की, “अखिल भारतीय सेवा, नियम 1958 च्या तरतुदीनुसार, परम बीर सिंग IPS (निवृत्त) यांचे निलंबन या आदेशाद्वारे रद्द करण्यात आले आहे आणि 02/12/2021 ते 30/06/2022 पर्यंतच्या निलंबनाचा कालावधी हा सर्व उद्देशांसाठी ऑन ड्युटी कालावधी मानला जाईल.”