संजय राऊत उगाचच काही ना काही उकरून काढतं आहेत !
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२३ । राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलेच संतापलेले असल्याचे दिसून येत आहेत. कारण महाविकास आघाडीविषयी लिहिलेल्या अग्रलेखावर त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी भुजबळ म्हणाले कि, राऊत यांनी इतकं लक्ष शिंदे गटाच्या आमदारांच्या बॅगांवर ठेवले असते तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती, याच बरोबर ते असेही म्हणाले कि, आघाडीत बिघाडी नको’ अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे उगाचच काही ना काही उकरून काढतं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातून उद्धव ठाकरे यांचे मंत्रालयात दोनदा जाण्याच्या भूमिकेवर भाष्य केले . त्यावर खासदार राऊत यांनी सामनाच्या लेखा मधून टीका केली. खासदार शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरचे मोठे नेते आहेत. परंतु पक्ष पुढे नेता येईल, असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. अशी टीका करण्यात आली आहे.